धुळे जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतीच्या ६० जागांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 11:58 IST2019-05-15T11:57:38+5:302019-05-15T11:58:32+5:30
२१ मे रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार

धुळे जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतीच्या ६० जागांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया सुरू
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतीच्या ६० जागा विविध कारणांमुळे रिक्त असून, त्यासाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाकडून प्रकिया सुरू जालेली आहे. २१ मे रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर होणार असून, त्यानंतरच पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र त्यातील ६० जागा काही कारणास्तव रिक्त झाल्या. या ६० जागा भरण्यासाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेली आहे.
त्यादृष्टीने प्रशासनाकडून या ग्रामपंचायतीच्या प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. या यादीची प्रसिध्दी १५ मे रोजी केली जाणार आहे.प्रारूप मतदार यादीवर १५ ते १७ या दोन दिवसात संबंधितांना हरकती घेता येणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी २१ मे रोजी जाहीर करून, निवडणुक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे.
धुळे तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीतील ११ जागा, साक्री तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या १२ जागा,शिरपूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या १४ आणि शिंदखेडा तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या २४ रिक्त पदासाठी पोटनिवडणुक घेतली जाणार आहे.