प्रभाग दोनमध्ये जाणून घेतल्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 21:58 IST2021-01-05T21:58:07+5:302021-01-05T21:58:29+5:30
सभापती आपल्या दारी उपक्रम

dhule
धुळे : सभापती आपल्या दारी उपक्रमांतर्गत महापालिकेचे स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी नगरसेवकांसह प्रभाग दोन मधील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर सदर समस्या सोडविण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.
वतीने सभापती आपल्या दारी मोहिमेद्वारे प्रभागातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यात येत असून, मंगळवारी शहारातील प्रभाग दोनमधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात आल्या आहेत. शहरातील प्रभाग दोनमधील संत सेना नगर,जिल्हा परिषद कॉलनी, ऑडिटर कॉलनी, ग.द. माळी सोसायटी तसेच घुगेनगर या भागाची मनपा सभापती सुनील बैसाणे यांनी पाहणी केली. यावेळी नागरिकांची प्रभागातील समस्या अनेक दिवसांपासून मार्गी लागलेल्या नाही. मनपाकडे वारंवार तक्रारी करूनही त्या सोडविल्या जात नाही. समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात अशी मागणी केली. या मोहिमेंतर्गत रस्त्यावरील घाण, गवत, ॲबेटिंग, फवारणी, कंटेनर सर्वेक्षण, बंद पथदिवे, पाईपलाईन लिकेज काढणे, घंटागाडी नियमित नसल्याची तक्रारी, शौचालयांची दुरुस्ती, गटारीवरील अतिक्रमण अशा विविध समस्या सोडवल्या जात आहेत.
या मोहिमेत नगरसेवक सुनील सोनार, नगरसेविका भारती माळी, सुमनबाई वाघ, अभियंता पी. डी. चव्हाण, आरोग्य विभागाचे चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील, स्वच्छता निरीक्षक गजानन चौधरी, सामाजिक कार्यकर्ता पप्पू वाघ, राजेंद्र मुर्तडकर, डाॅ. चौधरी, देवीदास ठाकरे, सतीश जैन आदी उपस्थित होते.
या मोहिमेला प्रभाग क्रमांक १ पासून सुरुवात झाली आहे. तेथील समस्या जाणून घेतल्या आहेत.