शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

धुळ्यानजिक खाजगी बस ट्रकवर धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 12:05 IST

बसमधील एकजण जागीच ठार : ३० जण जखमी, मोहाडी उपनगर पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भरधाव वेगाने जाणारी खाजगी प्रवाशी प्रवाशी बस रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन धडकली. या अपघातात एक प्रवाशी जागीच ठार झाला, तर ३० जण जखमी झाले. जखमींपैकी १४ प्रवाशी नेपाळमधील आहेत.  हा अपघात मुंबई -आग्रा महामार्गावरील  हॉटेल रेसिडेन्सी पार्कसमोर शनिवारी पहाटे  चारवाजेच्या सुमारास झाला. याप्रकरणी मोहाडी उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार  खाजगी प्रवाशी  बस  (क्र.एमपी ०९-एफए ८५४७) मुंबई येथून इंदूरकडे भरधाव वेगाने जात होती.  शहरातील हॉटेल रेसिडेन्सी पार्कजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर (क्र.पीबी ०६- व्ही ७५४५) ही बस मागून जोरात धडकली. या भीषण अपघातात बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात बसच्या कॅबिनमध्ये बसलेला इरफान शेख सादीक (३५, रा. कल्याण) हा प्रवाशी जागीच ठार झाला. तर इतर ३० प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर जखमींना १०८ रूग्णवाहिकेतून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.जखमींमध्ये मो.साबीर मो.रफीक (२४, रा. मध्यप्रदेश), रतन बुडा (४९), तनबहादूर बुडा (५६), अजय बुडा (७८), बाने बुडा (३८), लोकबहादूर बुडा (३०), नरवीर बुडा(३०), खमा बुडा(५०), धनराज बुडा (३२), निमराज बुडा (२८), थलासिंग बुडा (६२), बोला बहादूर बुडा (४३) प्रियंका उपाध्यक्ष (२९), आशिष नेमा (३२, रा.इंदूर), दिपेश कुमार (५०, रा.इंदूर), समीम इमाम हसन (२६, रा. बदासर, युपी), हनिष पठान हजी (४८, रा.इंदूर), इद्रिस सादिक शेख (३२, रा. मुबंई), ओमप्रकाश बागडी (३५, रा. खंडवा), प्रविण चव्हाण (३२, रा. सनादर, जि.खरगोन), सुफयान सादीक शेख (२१, रा. मुंबई), कपीलकुमार मंडलई (३७, रा. मुंबई), शबनम शेख सादीक (२५ रा. कल्याण), मेहबान सादीक शेख ४६,रा. कल्याण), गंगाबाई नाईक बंजारा (३८, रा. इंदूर) आदींचा समावेश आहे. सर्व जखमींवर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी मोहाडी उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात