शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 21:39 IST

प्रहार जनशक्ती पक्ष  : जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन, आंदोलनकर्त्यांना अटक व सुटका

धुळे : शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, पीक विम्याची रक्कम तातडीने द्यावी यासह शेतकरी, ओ.बी.सी., आदिवासी व सर्वसामान्य जनतेच्या मागण्या पूर्ण कराव्यात आदी मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आज जेलभरो आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी, ओबीसी, आदिवासी व सर्वसामान्य जनतेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नाही. त्यांच्या समस्या शासनाने सोडवाव्यात. दरम्यान शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीच्या पेरणी ते कापणीपर्यंत कामाचा समावेश मनरेगा अंतर्गत करावा, दुष्काळग्रस्त भागातील शेतकºयांना दुष्काळी अनुदान द्यावे, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करावे, ओबीसीसाठी स्वतंत्र घरकूल योजना करून आर्थिक तरतूद करावी, आदिवासींचे प्रलंबित वनहक्क, जमीनपट्टे, त्वरित वाटप करावेत, कांदा, तूर उत्पादकांना जाहीर केलेले अनुदान द्यावे, प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन , मोबदला व नोकरी द्यावी, दुबार पेरणीच्या संकटात असलेल्या शेतकºयांना बियाणे, खत व आर्थिक मदत द्यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलीसांनी अटक करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. वसंत बोरसे, मंदाकिनी गायकवाड, स्वप्नील जाधव, डॉ. राजेंद्र पाटील, ईश्वर बोरसे, पंकज सिसोदीया, कैलास भदाणे, संजय सरग, दिलीप दगडे, भूषण अहिरे, सरला खैरनार, कविता पाटील, संजय विभांडीक, कैलास तिरमले आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे