ऑनलाइन वेबिनारमध्ये ५२ प्राध्यापकांसह प्राचार्यांनी नोंदविला सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:32 IST2021-03-15T04:32:21+5:302021-03-15T04:32:21+5:30
या वेबिनारसाठी वक्ते म्हणून प्रा. डॉ. हेलन जोसेफ, निवृत्त प्राध्यापक, निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालय, मुंबई आणि प्रा. डॉ. अंबादास ...

ऑनलाइन वेबिनारमध्ये ५२ प्राध्यापकांसह प्राचार्यांनी नोंदविला सहभाग
या वेबिनारसाठी वक्ते म्हणून प्रा. डॉ. हेलन जोसेफ, निवृत्त प्राध्यापक, निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालय, मुंबई आणि प्रा. डॉ. अंबादास मोहिते, संस्थापक अध्यक्ष ‘मास्वे’ संघटना, आदी मान्यवर सहभागी झाले होते, तर प्राचार्य डॉ. जालिंदर अडसुळे वेबिनारच्या अध्यक्षस्थानी होते. या वेबिनारसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पाच समाजकार्य महाविद्यालय व विद्यापीठातील समाजकार्य विभागाचे प्राचार्य, प्राध्यापक सहभागी झाले होते.
यावेळी प्रा. डॉ. अंबादास मोहिते यांनी राष्ट्रीय समाजकार्य शिक्षण परिषद स्थापन झाल्यास समाजकार्य शिक्षणाला एक व्यावसायिक दर्जा मिळण्यास मदत होईल. समाजकार्य शिक्षणाला राष्ट्रीय ओळख प्राप्त होईल. समाजकार्याचे शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता व दर्जा उंचावेल, असे त्यांनी प्रतिपादन केले. प्रा. डॉ. हेलन जोसेफ यांनी मार्गदर्शन केले. समारोप वेबिनारचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जालिंदर अडसुळे यांनी केला.