नेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:38 IST2021-05-11T04:38:09+5:302021-05-11T04:38:09+5:30
नेर- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसचा पुरवठा झाला नसल्याने नागरिकांना माघारी फिरावे लागत आहे. वैद्यकीय अधिकारी यांनी ...

नेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात
नेर- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसचा पुरवठा झाला नसल्याने नागरिकांना माघारी फिरावे लागत आहे. वैद्यकीय अधिकारी यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे दुसऱ्या डोसच्या १५०० आणि पहिल्या डोसच्या ५०० अशा २००० लसींची मागणी केली आहे.
नेर हे धुळे तालुक्यातील मोठे गाव आहे. गावाची लोकसंख्या ३० हजारांवर आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ ४५ वर्ष आणि दुर्धर आजार असलेल्यांना लस देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांना पहिला डोस दिला गेला आहे; परंतु दुसरा डोस देण्याची वेळ आली असूनही लसींचा पुरवठा करण्यात आलेला नाही, त्यामुळे नागरिक रोज प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी येतात; परंतु लस उपलब्ध नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागत आहे, तसेच या आरोग्य केंद्रात १८ ते ४४ वयोगटातील तरुण आणि नागरिकांना लस देण्याची परवानगी नाही. त्यामुळे या वयोगटातील लाभार्थ्यांना इतर आरोग्य केंद्रात लससाठी भटकावे लागत आहे. त्यामुळे नेर आरोग्य केंद्रातच लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.