ताडपत्री झाकून म्हशींची अवैध वाहतूक रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 22:09 IST2020-07-28T22:09:09+5:302020-07-28T22:09:30+5:30
तरण अटकेत : ९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ताडपत्री झाकून म्हशींची अवैध वाहतूक रोखली
धुळे : धुळ्याहून मालेगावकडे कत्तलीच्या उद्देशाने म्हशींची अवैध वाहतूक करणारे वाहन आर्वी पोलीस चौकीजवळ पोलिसांनी पकडले़ ही कारवाई गोरक्षकांच्या मदतीने मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास करण्यात आली़
एमएच १८ व्हीजी ६०७२ क्रमांकाचे आयशर वाहनातून जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्यानुसार, मुंबई आग्रा महामार्गावर आर्वी शिवारात बॅरिकेट लावून वाहनांची तपासणी करण्याची मोहीम सुरु केली़ मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास माहिती मिळालेले वाहन आल्यानंतर ते थांबविण्यात आले़ वाहनाची तपासणी केली असता वाहनात ताडपत्री झाकून म्हशी अवैध वाहतूक केली जात असल्याचे समोर आले़ या वाहनात कोंबून १८ म्हशी पोलिसांना आढळून आल्या़ या जनावरांच्या वाहतुकीचा कोणताही परवाना चालकाकडे नव्हता़ पोलिसांनी ७ लाखांचे वाहन, १८ म्हशी असा एकूण ९ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला़ वाहनचालक मंगतू खान मोती खान (२७, नाई मोहल्ला, बालसमन ता़ कासारवाडा जि़ खरगोन) या संशयिताला ताब्यात घेतले आहे़ तपास सुरु आहे़