धाडणे येथे प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:24 IST2021-07-04T04:24:32+5:302021-07-04T04:24:32+5:30
धाडणे येथील मोहन दीपक बदाने (२०) व त्याच्याच गल्लीत राहणारी दीपाली यांचे प्रेम प्रकरण गेल्या काही दिवसापासून सुरू होते. ...

धाडणे येथे प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
धाडणे येथील मोहन दीपक बदाने (२०) व त्याच्याच गल्लीत राहणारी दीपाली यांचे प्रेम प्रकरण गेल्या काही दिवसापासून सुरू होते. परंतु त्यांच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला. दीपाली व मोहन ३० जूनपासून बेपत्ता होते. त्यांनी सोबत जीने मरने की शपथही घेत गावाशेजारी असलेल्या विहिरीत एकमेकांना दोराने बांधून आपला जीव दिला. त्या विहिरीवरील मोटर चालू करण्यासाठी गुलचंद पवार नावाचा इसम गेला असता त्याला शनिवारी या दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. त्याने ही माहिती गावकऱ्यांना दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना याची माहिती दिली. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
चौकट
घटनेची पुनरावृत्ती - तीन वर्षांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. साक्री - पिंपळनेर रस्त्यालगत असलेल्या एका वडाच्या झाडाला एका प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर ही दुसरी घटना आहे. घटनेमुळे गावात एकच खळबळ व हळहळ व्यक्त करण्यात येत आहे