धुळ्यात पूर्ववैमनस्यातून वाद, परस्पर विरोधी फिर्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 21:44 IST2018-04-15T21:44:52+5:302018-04-15T21:44:52+5:30
राऊळवाडीतील घटना : तणावाची स्थिती

धुळ्यात पूर्ववैमनस्यातून वाद, परस्पर विरोधी फिर्याद
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील चितोड रोडवरील राऊळवाडीत पूर्ववैमनस्यातून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला़ वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने धुळे शहर पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली़ ही घटना शनिवारी घडली़ यावेळेस काही काळ परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती़
एका गटातील सतिष विजय इंगवले (२४, रा़ राऊळवाडी, चितोडरोड, धुळे) यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, मागील भांडणाची कुरापत काढून राऊळवाडी चितोड रोड येथे राहणारे राजेंद्र माणिक सुपनर यांनी वाद निर्माण केला़ शिवीगाळ करत हाताबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली़ दमदाटीही केली़ ही घटना चितोड नाका चौकात शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली़ भरदुपारी अचानक अशा प्रकारची हाणामारीची घटना घडल्यामुळे या भागात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ याप्रकरणी भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला़
दुसºया गटातील ईशा मनोज सुपनर या युवतीने शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, न्यायालयात दाखल केलेले प्रकरण मागे घ्या या कारणावरुन सतिष इंगवले आणि त्यांची आई या दोघांनी शिवीगाळ करत दमदाटी केली़ ही घटना राऊळवाडी भागात घरासमोर शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली़ अचानक झालेल्या वादविवादामुळे या भागात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ याप्रकरणी शनिवारी सायंकाळी सतिष इंगवले यांच्या विरोधात भादंवि कलम ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़