मान्सूनपूर्व पावसाने शेतात साचले तळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 22:27 IST2020-06-06T22:27:04+5:302020-06-06T22:27:35+5:30
कापडणे : कापूस बियाणे खराब होण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांची चिंता वाढली

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे : लोणकुटे शिवारात बुधवारी दिवसा व रात्रभर झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतात पाणी साचले. शेतात कापूस लागवड करण्यात आलेली आहे. या पाण्यामुळे बियाणे खराब होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
३० व ३१ मे रोजी तापमानाचा पारा ४४ ते ४५ अंशावर होता. मात्र, १ जून रोजी सर्वत्र ढगाळ वातावरण झाले. १ व २ जून रोजी कापडण्यासह परिसरात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे शेतकºयांची खरीपपूर्व हंगामाची तयारी करण्यासाठी धावपळ सुरु होती. १ जून पासून मान्सून केरळमध्ये दाखल येण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्रात निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनपूर्व पाऊस झाला. ३ जून रोजी संपूर्ण दिवसभर व रात्रभर अधून-मधून पाऊस सुरु होता.
बागायतदार शेतकºयांनी २० ते २५ मे नंतर खरीपपूर्व कापसाची लागवड केली आहे. मात्र, ३ जून रोजी झालेल्या पावसाने शेतात कापूस लावलेल्या सर्व चाºया पाण्याने तुडुंब भरल्या.
नुकतीच कापूस बियाण्यांची लागवड केलेली असल्याने जमिनीतील कापूस पिकाचे बियाणे सडून खराब होऊ शकतात. मात्र, काही मोजक्या शेतकºयांच्या उतार भागात शेतातच पावसाचे पाणी साचलेले दिसून येत होते.
कापडण्यासह धनुर, लोणकुटे, दापोरा, दापोरी या शिवारातील शेत जमिनीत नुकतेच लागवड केलेल्या कापूस पिकाच्या चाºयांमध्ये पावसाचे पाणी साचलेले दिसून आले. यामुळे शेतकºयांनी खरीपपूर्व हंगामात लागवड केलेल्या कापूस पिकाच्या बियाण्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पाण्याचा निचरा होऊ न शकल्यास शेतकºयांना आर्थिक फटका बसू शकतो, अशी चिंता शेतकºयांमध्ये आहे
गुरुवारी ४ रोजी पावसाने उघडीप दिल्याने वातावरण कोरडे होते. यामुळे शेतकरी बागायती कापसाची लागवड करण्यासाठी शेतात कामे करतांना दिसून येत होते तर काही शेतकरी खरीपपूर्व हंगामातील कोरडवाहू शेती मशागतीची कामे करताना दिसून आले.
कोरोनाच्या भीषण संकटाने देश हवालदिल झालेला असताना यंदा नैऋत्य मौसमी पाऊस भारतात ठरल्यावेळी येईल आणि भरपूर कोसळेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली असल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.
१ जून रोजी भारतीय उपखंडाच्या अगदी दक्षिणेकडे केरळ किनाºयावर नैऋत्य मौसमी पाऊस ठरल्यावेळी दाखल झाल्यामुळे महाराष्ट्रातील पुणे शहरात देखील १० जूनपर्यंत नैऋत्य मौसमी पावसाचे आगमन होईल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.
कोरडवाहू शेतकरी खरीपपूर्व शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. तर काही शेतकरी बागायती कापूस लागवडीची कामे उरकताना दिसून येत आहेत. शेतकºयांना आता नैऋत्य मौसमी पावसाचे आगमन केव्हा होईल, याची प्रतीक्षा लागली आहे. येणारा खरीप हंगाम चांगला जावो, अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली.