शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

रस्तादुरुस्तीसाठी आंदोलनाचा पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:40 AM

नरडाणा येथे अडीच महिन्यांपासून प्रश्न कायम : दुरुस्तीसाठी दिली आठ दिवसांची मुदत

नरडाणा : येथील उड्डाणपुलाजवळ बायपास जवळून जाणाऱ्या महामार्गावर गतिरोधक बसवा, पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करा, रस्त्याकडेला साचलेली वाळू उचलावी उड्डाणपुलावरील लाईट सुरु करण्यात यावेत तसेच रस्त्याच्या मध्यभागी गुरे चारणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यांसाठी येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात दिसत आहेत. या संदर्भात सोमवारी पोलिसांना निवेदनही सादर करण्यात आले. त्यात मागण्यांची तड न लागल्यास अचानक रास्तारोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.गावाजवळून जाणाºया मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर गेल्या ३१ आॅगस्ट रोजी डांबरचे ड्रम घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला होता. तीन दिवसांनंतर हा ट्रक जागेवरून उचलण्यात आला. तोपर्यंत महामार्गावरील वाहतूक ही दुसरीकडून वळविण्यात आली होती. याच तीन दिवसांच्या कालावधीत याच ठिकाणी अजून एक ट्रक पलटी झाला होता. येथील उड्डाणपूल व हा रस्ता दोषपूर्ण आहे. १९९६ मध्ये आयुष्य अजय कन्स्ट्रक्शन कंपनीने गावात जाण्याच्या उद्देशाने बनवले होते. त्या नंतर २०१४ मध्ये आलेल्या सदभाव इंजीनियरिंग कंपनीने उड्डाणपुलाच्या व रस्त्याच्या कामात कोणताही बदल न करता या रस्त्याला काटकोनात वळवून गावाबाहेरुण जाणाºया बायपासला जोडून देण्यात आले. त्यानंतर याच उड्डाणपुलाजवळ आजपर्यंत शेकडो अपघात होऊन अनेक निरपराध प्रवाशांना नाहक जीव गमवावा लागला तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व प्राप्त झाले.बनले अपघातस्थळरस्ता ओलांडून येथील तसेच परिसरातील ग्रामस्थांना वीज मंडळ, दूरध्वनी व गॅस सिलिंडरसाठी तेथील एजन्सीकडे व त्या भागातील वसाहतीकडे नेहमीच ये-जा करावी लागते. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात घडतात. डांबर वाहतूक करणारा ट्रक उलटल्याच्या घटनेला अडीच महिने होऊनही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. संबंधित शासकीय व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्याने येथील ग्रामस्थांसह प्रवाशांमध्ये सखेद आश्चर्य व्यक्त होते.दुुरुस्तीसाठी आठ दिवसांची मुदतरस्त्याच्या या स्थितीमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी येत्या आठ दिवसांत या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. दुरुस्ती न झाल्यास पोलीस प्रशासन संबंधित टोलचे अधिकारी व संबंधित महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांना कोणतीही पूर्वसूचना न देता रास्ता रोको आंदोलनाचा इशारा महेंद्र सिसोदे, अशोक पाटील, विजय सिसोदे, लीलाधर सोनार, सनी सिसोदे, राजेंद्र पवार, नितीन जैन, सुभाष संकलेचा, एम.आर. जाधव, सुरेश पाटील, दिनेश सिसोदे आदींनी दिला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे