व्यंगचित्रकार सबनीस यांचे साकारले चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:12 IST2019-12-28T23:12:16+5:302019-12-28T23:12:51+5:30

श्रध्दांजली । मुंबईत झाले निधन

 A portrait by cartoonist Sabnis | व्यंगचित्रकार सबनीस यांचे साकारले चित्र

Dhule

धुळे : आयुष्यातील तब्बल पन्नास वर्ष व्यगचित्राव्दारे समाजसेवा तसेच राजकीय व्यंगातून चौफेर फटकारे मारणारे ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे निधन झाले़ त्यांचे धुळ्यात पहिले व्यंगचित्र भटू बागले यांनी चार वर्षापुर्वी साकारले होते़
व्यंगचित्रकार सबनीस यांंच्या व्यंगचित्र कारकीर्दीला यंदा ५० वर्ष पूर्ण झाली. १९६८ पासून अखंडपणे व्यंगचित्रकलेची साधना केली़ आऱ के़ लक्ष्मण यांनी बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्र पाहून ते प्रभावित झाले़ बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रांमागचा राजकीय विचार आणि त्यामागील विचारशक्ती पाहून आकर्षित झाल्याने सबनीस यांनी मराठी व्यंगचित्रकारांची कार्टूनीस्ट कंम्बाईन संस्था सुरू केली होती़ या संस्थेच्या कार्यरणी सदस्य असतांना अनेकवेळा व्यंगचित्रकार सबनीस यांच्याशी भेट होत होती़ त्यावेळी २०१६ मध्ये त्यांचे व्यंगचित्र साकारले असल्याचे भटू बागले यांनी सांगितले़

Web Title:  A portrait by cartoonist Sabnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे