धुळ्यात जुगाराचा अड्डा पोलिसांनी उधळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 11:45 IST2020-03-03T11:45:06+5:302020-03-03T11:45:25+5:30
मोहाडी पोलिसांची कारवाई : सहा वाहनांसह दीड लाखांचा ऐवज जप्त

धुळ्यात जुगाराचा अड्डा पोलिसांनी उधळला
आॅनलाइन लोकमत
धुळे : शहरातील वडजाई रोडवरील कब्रस्ताननजिक बखळ जागेत सुरु असलेला जुगाराचा खेळ मोहाडी पोलिसांनी उधळून लावला़ रविवारी सायंकाळी कारवाई करत लॅपटॉप, ३ दुचाकी, ३ रिक्षा असा एकूण १ लाख ४३ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला़ यात सहा जणांविरुध्द मोहाडी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला़
वडजाई रोडवरील कब्रस्ताननजिक बखळ जागेत अवैधरित्या जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळालीक़ारवाई केली़ जुगार खेळताना मुक्तार अहमद जमील अहमद शेख (५०, मिल्लत नगर, धुळे), जहीर हसन अब्दुल वहाब (४०, धुळे), मोईदीन शेख गुलाब (४०, धुळे), आसीफ बेग सलीम बेग (४२, रा़ धुळे), आतीक नजीर शेख (३५, रा़ धुळे), मुकेश मधुकर दरवेशी (३५, धुळे) या सहा जणांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले़ याठिकाणी असलेल्या एमएच १९ एएक्स ९८८४, एमएच ०४ सीझेड ५४२० आणि एमएच ०३ बीएन ५१३० या क्रमांकाच्या तीन रिक्षा तसेच एमएच १९ बीआर २२९२, एमएच १८ एएम ५८४१ आणि एमएच १८ एल ८८४४ या क्रमांकाच्या मोटारसायकली अशी सहा वाहने मोहाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत़ या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली.