पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची झाली मुख तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:32 IST2021-02-15T04:32:02+5:302021-02-15T04:32:02+5:30
जिल्हात ४ ते २२ फेबुवारी या कालावधीत जागतिक कर्करोग जनजागृती पंधरवडा राबविण्यात येत आहे. शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय ...

पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची झाली मुख तपासणी
जिल्हात ४ ते २२ फेबुवारी या कालावधीत जागतिक कर्करोग जनजागृती पंधरवडा राबविण्यात येत आहे. शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी डाॅ. नितीन पाटील, स्थानिक पोलीस ठाण्याचे शिवाजी बुधवंत, ॲड. सर्वोतम कुलकर्णी, जयश्री चाैधरी, धनश्री बच्छाव, महेंद्र नेरकर, प्रदीप ठाकूर आदींच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या हस्ते तंबाखूची होळी करण्यात आली.
यावेळी नोडल अधिकारी डाॅ.नितीन पाटील म्हणाले की, कर्करोगापैकी एक तृतीयांश कर्करोगावर प्रतिबंध करता येतो़ तर एक तृतियांश कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास प्रभावशाली उपचाराने रुग्णांचे आयुष्य वाढविता येते. जिल्ह्यात पुरुषामध्ये होणारा कर्करोग तसेच गर्भाशयाचे व स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे़ या कर्करोगावर प्रभावशाली जनजागृती व योग्य तपासणी केल्यास प्रतिबंध घालता येऊ शकतो, असे सांगितले.
शासकीय कार्यालयात तपासणी
सरकारी अधिकारी व कर्मचारी तंबाखू व व्यसनांपासून दूर राहावे, यासाठी जिल्हातील सर्व सरकारी कार्यालयात तपासणी राबविण्यात येत आहे.
या मोहिमेव्दारे सर्वांना कर्करोगाची लागण व खबरदारीबाबत जनजागृती केली जात आहे.