पोलिसाची नोकरी, ना ड्युटीची वेळ, ना पगाराचा मेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST2021-02-05T08:44:51+5:302021-02-05T08:44:51+5:30
ड्युटी किती तासांची? पोलिसांची ड्युटी तशी ८ तासांची आहे. सर्वश्रुत असलेतरी काहीवेळेस कामांच्या स्वरूपानुसार १० ते १२ तास होऊन ...

पोलिसाची नोकरी, ना ड्युटीची वेळ, ना पगाराचा मेळ!
ड्युटी किती तासांची?
पोलिसांची ड्युटी तशी ८ तासांची आहे. सर्वश्रुत असलेतरी काहीवेळेस कामांच्या स्वरूपानुसार १० ते १२ तास होऊन जातात.
कुटुंबासाठी किती वेळ?
कुटुंबासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न असलातरी जास्त वेळ देऊ शकत नाही. तरदेखील ५ ते ६ तासांचा वेळ देण्याचा प्रयत्न असतो.
मुलांचे शिक्षण कसे?
मुलगा हा बीएस्सी करीत आहे. तर मुलगी ही एमबीएचे शिक्षण घेत आहे. त्यांना आवडीचे आणि पुरेसे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न असतो.
स्वत:चे घर आहे का?
पोलिसांचे निवासस्थान हे प्रामुख्याने शासनाच्या घरातच जाते. तसे मी सुध्दा याच निवासस्थानी वास्तव्यास आहे. निवृत्तीनंतर पुढचे नियोजन करू.
कोट
पोलिसाची नोकरी कशी आणि किती वेळेची असते हे यांच्याशी लग्न केल्यानंतर समजले. त्यांच्याकडून बजाविण्यात येणारे त्यांचे कर्तव्य कसे हे समजू शकले. त्यामुळे त्यांच्या नोकरीच्या मध्ये मी कधीही आलेली नाही. अडचणी येत गेल्या आणि त्या सोडवायच्या कशा हे समजून घेऊन वेळोवेळी पतीची मदत घेऊन प्रश्न सोडविले. मुलांचे शिक्षण केले.
- रजनी अरुण सोनवणे, धुळे.
जिल्ह्यातील पोलीस - १८५०
शासकीय घरे मिळालेले पोलीस - ३५०