पोलिसांमुळे गुरांना मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 05:16 IST2019-05-28T05:16:23+5:302019-05-28T05:16:26+5:30
वडजाई रोडवरील मदरसा सिराजू लूम पाठीमागे गुरांना कत्तलीसाठी आणून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली़

पोलिसांमुळे गुरांना मिळाले जीवदान
धुळे : वडजाई रोडवरील मदरसा सिराजू लूम पाठीमागे गुरांना कत्तलीसाठी आणून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ तत्परतेने छापा मारल्याने चार गुरे पोलिसांच्या हाती लागली असून एकाला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे़
रविवारी सायंकाळी आझादनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश आहेर यांना वडजाई रोडवरील गोदामात कत्तलीसाठी गुरांना आणून ठेवल्याची माहिती मिळाली़ हा भाग चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे आहेर यांनी तेथील पोलीस निरीक्षक कुबेर चवरे यांना माहिती दिली. त्यानंतर दोन्ही ठाण्यांनी संयुक्त मोहीम राबवत छापा टाकला़ गोदामात चार गायींसह दोन जिवंत बैल तसेच मांस मोजण्यासाठी वजनकाटा, सुरा आढळला.