घरात रंगलेला पत्त्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 22:43 IST2020-01-06T22:43:33+5:302020-01-06T22:43:56+5:30
सव्वा दोन लाखांचा ऐवज : विशेष पथकाची कामगिरी

घरात रंगलेला पत्त्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला
धुळे : देवपुरातील नकाणे रोडवरील एकविरा नगरात असलेल्या एका घरावर छापा टाकून ९ जुगाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले़ त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराची साहित्य मिळून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी रात्री केली़
नकाणे रोडवरील एकविरा नगरात सुमाणिक गॅस एजन्सी गोडावूनच्या जवळ असलेल्या एका बंद घरात तीनपत्ती जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना मिळाली़ त्यानुसार, एकविरा नगरातील लक्ष्मण भिकारी चांगरे यांच्या घरावर रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला़ याठिकाणी तीनपत्ती खेळणाºया ९ जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले़ घरमालक लक्ष्मण चांगरे यांच्यासह पृथ्वीराज पाटील (रा़ साईबाबा मंगल कार्यालयाजवळ), राजेंद्र किशनलाल हासवाणी (रा़ कुमार नगर, धुळे), धनंजय बाळकृष्ण पाटील (रा़ तिरुपती नगर, धुळे), जगदीश भाईदास पगारे (रा़ अनुजा सोसायटी, धुळे), राजेंद्र सुरेश अहिरराव (रा़ श्रध्दानगर, धुळे), दिलीप सखाराम पाटील (रा़ विनोद नगर, धुळे), पंडीत कौतिक नेरकर (रा़सिंचनभवनामागे, धुळे), अरुण वामन लोखंडे (रा़ पाटबाजार, धुळे), अशी जुगार खेळणाºया संशयितांची नावे आहेत़ या ९ संशयितांकडून रोख रकमेसह मोबाईल, मोटारसायकल, जुगाराचे साहित्य असे मिळून तब्बल २ लाख २३ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला़ या ९ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह पथकातील पोलीस कर्मचारी प्रल्हाद वाघ, कमलेश सूर्यवंशी, पंकज खैरमोडे, कबीरोद्दीन शेख, मुख्तार मन्सुरी, कर्नल बापू चौरे, जोएब पठाण, मोहन पवार यांनी ही कारवाई केली़