कोरोनाचा पुन्हा वाढलेला प्रादुर्भाव बघता समस्त ग्रामस्थांनी काळजी घेणे आपल्या आणि इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचे असेल.आजपासून कोणीही "बिना मास्क" बाहेर पडू नये अथवा नाका तोंडाला कपडा किंवा रुमाल बांधल्याशिवाय, विनाकारण घराबाहेर पडू नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन काटेकोर करावे असे आवाहन केले आहे.
नियमाचे पालन न केल्यास दंडात्मक कार्यवाहीस सामोरे जावे लागण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मास्क वापरणे, पाच पेक्षा अधिक लोकांनी जमू नये, सोशल डिस्टनसिंग पाळले पाहिजे अशी सूचना देत ग्राम पालिकेने रिक्षा गावात फिरविली.
निजामपूर पोलीस ठाण्याचे एपीआय सचिन शिरसाठ यांनी विना मास्क कुणी दिसले तर कारवाई व दंड ठोठावला जाणार असा इशारा दिला आहे.