एसआरपी जवानाने केला प्लाझ्मा दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 22:01 IST2020-07-29T22:01:18+5:302020-07-29T22:01:35+5:30
धुळे : येथील राज्य राखीव बल गट क्रमांक सहाचे जवान विजय निंबा गवळी यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात प्लाझ्मा ...

dhule
धुळे : येथील राज्य राखीव बल गट क्रमांक सहाचे जवान विजय निंबा गवळी यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात प्लाझ्मा दान करुन आदर्श निर्माण केला आहे़
मुंबई येथे कोरोना बंदोबस्तावर असताना विजय गवळी यांना कोरोनाची लागण झाली होती़ उपचाराअंती त्यांनी कोरोनावर मात केली़ प्लाझ्मा दान करणारे ते पहिले जवान ठरले आहेत़ यापूर्वी त्यांनी २४ वेळा रक्तदान देखील केले आहे़
समादेशक संजय पाटील यांच्या हस्ते एक हजाराचे रोख बक्षीस आणि सन्मानपत्र देवून त्यांचे कौतुक करण्यात आले़ यावेळी सहायक समादेशक एऩ एऩ सोळंके, निरीक्षक चंद्रकांत पारसकर, नामदेव पवार, किशोर सोनवणे उपस्थित होते़
वेळोवेळी रक्तदान करणारे जवान मनोज देवरे, कमलेश भामरे, वसिम शेख यांचा देखील सन्मान करण्यात आला़