लग्नातून दिला वृक्षरोपणाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 22:48 IST2019-05-14T22:46:56+5:302019-05-14T22:48:07+5:30
कासारे : अक्षदा ऐवजी टाकण्यात आली फुले ; वधु-वरांच्या हस्ते अभिनव उपक्रम

dhule
कासारे : येथील मेहता विद्यालयाच्या आवारात पारंपारिक विवाह सोहळा पार पडला़ विवाहपुर्वी वधु-वरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश दिला़ तर लग्नात अक्षदाऐवजी फुले टाकण्यात आली होती़
येथील विज्ञान शिक्षक युवराज देसले यांचा मुलगा हेमंत व होळ येथील चंद्रकांत पाटील यांची मुलगी दिया यांचा विवाह सोहळा कासारे येथे मंगळवार १४ रोजी पार पडला. लग्नात पर्यावरण संवर्धनाची संदेश देण्यासाठी वरपिता युवरा देसले यांनी वधु-वरांचे लग्न लागण्याआधी वृक्षलागवड व वृक्षांचे संगोपन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला़
यावेळी खान्देश गांधी बाळूभाई मेहता विद्यालयात वधू-वरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले़ लग्नात अक्षदांच्या रूपातून केवढे अन्न वाया जाते हा संदेश उपस्थितांना देण्यासाठी वधु-वरावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच लग्नमंडपात वृक्ष संवर्धन, व्यसनमुक्ती, बेटी पढाव, बेटी बचाव आदी विषयावरील पोस्टर लावले होते़ विशेष म्हणजे लग्न पत्रिकेतही पाणी वाचवा, पक्षांना भांड्यात पाणी ठेवा, वृक्षारोपण, बेटी बचाव आदी चित्रांचा समावेश त्यांनी केला होता़
यावेळी देवपूर विधायक समिती अध्यक्ष एन. सी.पाटील, ग.स.बँकेचे गटनेते सी .एन.देसले, माकांत देसले सरपंच विशाल देसले, सुरेश पारख, रवींद्र देसले, सचिन देसले उपस्थित होते.