रस्त्याचे काम झाल्याने समाधान व्यक्त
धुळे : येथील जुने जिल्हा रुग्णालय ते जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झालेली होती. काही महिन्यांपूर्वीच हा रस्ता दुरूस्त करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातून वावरणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
अनेक भागांत दिवसाही पथदिवे सुरू
धुळे : एकीकडे वीज बचतीचा संदेश दिला जात असताना, दुसरीकडे मात्र महावितरणकडूनच विजेचा अपव्यय सुरू आहे. शहरातील अनेक भागात दिवसाही पथदिवे सुरू असतात. सकाळी रस्त्यावरील पथदिवे लवकर बंद करण्याची मागणी आहे.
निजामपूरच्या विद्यार्थिनीचा सत्कार
निजामपूर : माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत निजामपूर-जैताणे येथील इंदिरा गांधी माध्यमिक कन्या विद्यालयातील ऐश्वर्या अविनाश जाधव हिने प्रथम क्रमांक मिळविला. प्रजासत्ताकदिनी तिचा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक ए. एस. अहिरराव हे देखील उपस्थित होते.