नवदाम्पत्यांच्या हस्ते केले वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 21:52 IST2019-05-27T21:52:02+5:302019-05-27T21:52:35+5:30
थाळनेर : शाळा परिसरात केले वृक्षारोपण, दरवर्षी वृक्ष लागवड करण्याचा घेतला संकल्प

dhule
थाळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे संपन्न झालेल्या विवाह सोहळ्याप्रसंगी नवदामपत्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले. दरवर्षी लग्नाचा वाढदिवस वृक्षारोपणाद्वारे साजरा करण्याचा संकल्प त्यांनी घेतला.
थाळनेर येथील वसंत संपतराव पानसरे यांची कन्या योगिनी व नागपूर येथील कै.गोपालराव भागवतराव देवकर यांचे चिरंजीव ओंकार यांच्याशी रविवारी शिरपूर किसान विद्या प्रसारक संस्था संचालित थाळनेर येथील संत गाडगे महाराज विद्यालयाच्या प्रांगणात विवाह सोहळा संपन्न झाला.
यावेळी वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीलाच या नवदामपत्यांनी मोठा उपक्रम हाती घेतल्याने समाजात त्यांचे कौतुक केले जात आहे.यावेळी वर वधू च्या आग्रहास्तव विद्यालयाच्या प्रांगणात वड व निंब अशा दोन वृक्षांची वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाने घेतली आहे. यावेळी नवदाम्पत्यांने आपला लग्नाचा वाढदिवस अशापद्धतीने वृक्षारोपण करुन दरवर्षी साजरा करण्याचा संकल्पही घेतला. अशा प्रकारे सर्वत्र उपक्रम राबविले गेले तर निश्चितच वातावरणात होणारा बदल हा काही प्रमाणात कमी होईल अशी प्रतिक्रिया लग्न सोहळ्यासाठी उपस्थित असलेले मान्यवरांनी व्यक्त केली.