पिंपळनेरला बंद घर फोडून सोनपोत लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 22:03 IST2019-10-14T22:02:50+5:302019-10-14T22:03:13+5:30
मोरया नगरातील घटना : पोलिसात गुन्हा

पिंपळनेरला बंद घर फोडून सोनपोत लंपास
धुळे : बंद घराचा फायदा घेऊन चोरट्याने ३ तोळे वजनाचे १ लाख ८५ हजार रुपये किंमतीची सोनपोत लांबविल्याची घटना पिंपळनेरातील मोरया नगरात घडली़ याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला़
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील मोरया नगरात राहणारे हिंमत गोविंद भामरे (३९) यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, शनिवार १२ आॅक्टोबर रोजी रात्री साडेआठ ते सोमवार १४ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान भामरे यांचे घर बंद होते़ चोरट्याने ही संधी साधून त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले़ घरात प्रवेश करीत संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करीत शोधाशोध केली़ घरात ठेवण्यात आलेले ३ तोळे वजनाची १ लाख ८५ हजार रुपये किंमतीची सोनपोत लंपास केली आहे़ भामरे घरी आल्यानंतर आपल्या घरी चोरी झाल्याचे लक्षात आले़ याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़