शिरपुरात झाडली पिस्टलमधून गोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 13:06 IST2018-07-30T13:04:58+5:302018-07-30T13:06:22+5:30
सुदैवाने जीवितहानी टळली : पित्रेश्वर कॉलनी भागातील घटना

शिरपुरात झाडली पिस्टलमधून गोळी
ठळक मुद्देशिरपुरात सर्रास पिस्टलचा वापरगोळी झाडल्याने दहशतीचे वातावरणपोलिसात फिर्याद दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : मुलीची छेडखानी करु नका असे समजविण्यास गेलेल्या तरुणावर पिस्तूल रोखण्याचा प्रयत्न झाला़ त्याचा हात झटकल्यामुळे गोळी जमिनीच्या दिशेने गेली़ अन्यथा जीवितहानी झाली असल्याची घटना शिरपूर शहरातील पित्रेश्वर कॉलनी भागात रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी रुपेश राजेंद्र बोरसे (शिंपी) या तरुणाने शिरपूर शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार, संशयित राहुल पाटील (रा़ शिंदखेडा) व त्याचे अन्य साथीदार यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले़