चारित्र्याचा संशय घेत विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:24 IST2021-07-08T04:24:06+5:302021-07-08T04:24:06+5:30
धुळे : शहरातील माहेर असलेल्या विवाहितेवर सासरी गुजरात राज्यात चारित्र्याचा संशय घेत सतत मारहाण शिवीगाळ करून शारीरिक आणि मानसिक ...

चारित्र्याचा संशय घेत विवाहितेचा छळ
धुळे : शहरातील माहेर असलेल्या विवाहितेवर सासरी गुजरात राज्यात चारित्र्याचा संशय घेत सतत मारहाण शिवीगाळ करून शारीरिक आणि मानसिक छळ केला, तसेच क्रूर वागणूक देऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिली, म्हणून सासरच्या ७ जणांविरुध्द पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
आशाबाई भूषण पवार (२६, रा. आनंदनगर, भोई सोसायटी देवपूर, ह.मु. गुरुदत्तनगर, गोंदूर रोड, वलवाडी, धुळे) असे या विवाहितेचे नाव आहे. ९ मार्च २०१५ रोजी तिचे लग्न झाले होते. तेव्हापासून छळ सुरू होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पती भूषण विश्वनाथ पवार, विमलबाई विश्वनाथ पवार, गोरख झिंगा अहिरे, रत्नाबाई गोरख अहिरे रा. मांजपूरा, बडोदा, गुजरात, अर्चना विजय जगताप, विजय शालिग्राम जगताप रा. रायगडनगर, सिडको औरंगाबाद, बापू लाला महाले रा. गाडेगेबाबा चाैक, जळगाव यांच्याविरुध्द पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी भादंवि कलम ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बी. आर. पिंपळे करीत आहेत.