शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधी यांच्या घरासमोर निदर्शनं करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 22:30 IST

कृषी विद्यापीठ : युवा सेनेने व्यक्त केला बैठकीत निर्धार

धुळे : जळगाव जिल्ह्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यात कृषी विद्यापीठाची घोषणा करून दोन ते तीन दिवस झाले आहे़ जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याविषयावर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही़ म्हणून लोक प्रतिनिधीच्या घराबाहेर निदर्शन करण्याचा निर्धार युवासेनेच्या बैठकीत करण्यात आला़कृषी विद्यापीठाच्या मागणीसाठी युवा सेनेची रविवारी बैठक घेण्यात आली़ यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख पंकज गोरे, युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख ऐश्वर्या अग्रवाल, शहरप्रमुख संदीप मुळीक, हरीश माळी, अंकिता गुजर, राज माळी, जीत पाटील, गोकुळ देवरे, मयूर निकम उपस्थित होते.कृषी विद्यापीठासाठी जिल्ह्याचे ठिकाण योग्य आहे़ मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथे कृषी विद्यापीठाच्या विषयाला तत्वत: मान्यता देऊन जिल्ह्यावर अन्याय केला आहे़ पन्नास वर्ष जुने कृषी महाविद्यालय तसेच तब्बल ७५० एकर जागा, राष्ट्रीय महामार्गावरील ठिकाण असताना देखील अन्यायकारक निर्णय घेतला आहे़ ९ ते १० वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केली़ मात्र, दोन ते तीन वषापुर्वी जळगाव येथे कृषी विद्यापीठ व्हावे अशी मागणी माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती़ त्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी होकार दर्शवुन धुळेकरांच्या अपमान केला आहे़ मुख्यमंत्र्यांचा या निर्णयाविरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला़ यावेळी सोमवारी संरक्षण मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या घराबाहेर निदर्शने, मंगळवारी शहराचे आमदार अनिल गोटे, बुधवारी दोंडाईचा येथे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या घराबाहेर शिंदखेडा तालुका युवा सेनेतर्फे निदर्शने केली जाणार आहे़ तर गुरुवारी नाकर्ते मंत्री, खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी अशा सर्वांचा मिळून एका पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे