पहिल्या दिवशी आॅनलाईन ७८८ रूपयांचा झाला भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:07 IST2019-06-02T23:05:51+5:302019-06-02T23:07:23+5:30
महापालिका : संकेतस्थळावर नागरिकांना कर भरण्याची सुविधा

dhule
धुळे : महापालिकेच्या मालमत्ता विभागाने विकासाचे एक पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे़ या अनुषंगाने आता नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा घरबसल्या आॅनलाईन करता येणार आहे़ रविवारपासुन ही प्रणाली सुरू करण्यात आली असुन पहिल्या दिवशी ७८८ रूपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले आहे़
नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाल्यानंतर मालमत्ता कराच्या रकमेत बदल करण्यात आला होता़ त्यात घराच्या लांबी-रुंदीनुसार कराची रक्कम निश्चित करण्यात आली होती़ यानुसार महापालिकेच्या तिजोरीत कराचा भरणा टप्या-टप्प्याने जमा होण्यास सुरुवात झाली होती़
कालांतराने जुन्या महापालिकेत मालमत्ता आणि पाणी पट्टीची कर प्रणाली स्वतंत्र करण्यात आली़ पैसे भरण्यासाठी त्याच ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली़ सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर नागरीकांच्या या ठिकाणी पैसे भरण्यासाठी रांगा लागण्यास सुरुवात झाली होती़ हा सर्व प्रकार गेल्या दोन ते वर्षापासून महापालिकेच्या जुन्या इमारतीत सुरु आहे़ मार्च, एप्रिल महिन्यातील ऊन लक्षात घेता नागरीकांच्या सोयीसाठी मंडपाची उभारणी आणि पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती़ हा उपक्रम यंदाही राबविण्यात आला़ वाढते उन लक्षात घेता आवश्यक त्या सोई नागरीकांना देण्यात आल्या़
पन्नास पेक्षा अधिक पर्याय
संकेतस्थळावर प्रत्येक मालमत्ता धारकास आपल्या मालमत्तेचे देयक पाहता येईल. तसेच क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून एकूण ५० हून अधिक पयार्यांचा वापर करून रकमा भरणा करता येतील. सन २०१२-१३ मध्ये करसंकलन विभागाचे रेकॉर्ड जळाल्यानंतर चाचपडत असलेल्या कर संकलन विभागास आता गतिमानता प्राप्त होणार आहे. संकेतस्थळामार्फत व एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून ही अत्यंत उपयुक्त सुविधा उपलब्ध करुन दिले जात असून यामुळे नागरिकांना कधीही आपली देयके तसेच भरणा केलेल्या देयकांच्या पावत्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
मोबाईल अॅप लवकर
आॅनलाइन मालमत्ता कर भरणा साइट आता थेट वापरासाठी उपलब्ध झाली आहे. आता नागरिक आॅनलाइन मालमत्ता कर देयके या वेबसाईटवरुन भरू शकतात. मालमत्ता कर आॅनलाईन भरणा करण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध करून दिला आहे़ येणाऱ्या काळात कराचा भरणा अधिक सोपा व्हावा, यासाठी लवकरच मोबाईल अॅप सुरू करण्यात येणार आहे़
जळीतकांडाचीही भीती नाही़
वसुली विभागात जुलै २०११ मध्ये आग लाग लावण्यात आली होती, या घटनेत २००५ पर्यंतच्या माल मत्ताधारकांचा संपूर्ण डाटा जळून खाक झाला होता़ संगणकीकरणाचे काम अनेक दिवसांपासून हाती घेण्याचे नियोजन होते़ संगणकीकरणाच्या कामात अडचणीही उद्भविल्या़ परंतु अखेर हे काम पूर्ण झाल्याने नागरिकांना आता रांगेत उभे राहण्याची आवश्यता राहणार नाही़
मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांना आता महापालिकेत येणाºया आवश्यकता नाही़ दोन दिवसापासून आॅनलाईन प्रणाली सुरू करण्यात आली आहे़ त्याव्दारे कर भरू शकता़
- सुधाकर देशमुख,
आयुत्त, महापालिका