रेसिंग कार स्पर्धेत पटेल अभियांत्रिकी द्वितीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:24 IST2021-07-08T04:24:13+5:302021-07-08T04:24:13+5:30
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील, उपप्राचार्य डॉ.प्रमोद देवरे, परीक्षा नियंत्रक ...

रेसिंग कार स्पर्धेत पटेल अभियांत्रिकी द्वितीय
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील, उपप्राचार्य डॉ.प्रमोद देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा.सुहास शुक्ल, विभाग प्रमुख डॉ. नितीन पाटील, प्रा.जी.व्ही.तपकिरे, प्रा.प्रवीण सरोदे, डॉ.व्ही.एस.पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रमुख मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन आदी उपस्थित होते.
आमदार अमरिशभाई पटेल यांनी विद्यार्थ्यांकडून सदर स्पर्धेचे स्वरूप आणि व्याप्ती तसेच विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वाहनाची तांत्रिक माहिती जाणून घेतली. कार रेसिंग स्पर्धेत पारितोषिक मिळविलेल्या विद्यार्थी संघाचे कौतुक करीत समाधान व्यक्त केले.
दोन टप्प्यात झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत भारतातून ६०० हून अधिक संघ सहभागी झाले होते. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात व्हर्च्युअल माध्यमातून लेखी परीक्षा आणि कार डिजाईनचे सादरीकरण करण्यात आले. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने सादर केलेल्या इंजिन बेस कारच्या डिझाईनची निवड झाली होती. दुसऱ्या टप्प्यात या डिझाईननुसार कारचे मॉडेल बनवले व त्याचे परीक्षण झाले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवलेली ही कार गोवा येथे झालेल्या रेसिंग स्पर्धेत यशस्वीरित्या धावली. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या कार्यशाळेत तयार केलेल्या या कारचे तांत्रिकदृष्ट्या विविध स्तरावर परीक्षण झाले. कार निर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञ परीक्षक म्हणून काम पाहतात. त्यात रेसिंग कारची डिझाईन, गतिशीलता, ब्रेक, स्टिअरिंग, ट्रान्समिशन, वाहन सुरक्षितता अशा बऱ्याच चाचण्या घेतल्या जातात. परीक्षणानंतर पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इंजिन बेसकारमध्ये भारतातून द्वितीय क्रमांक पटकाविला.
नाईट एनड्युरन्स या उच्च व खडतर चाचणीत सलग तीन तास न थांबता धावत या कारने संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक पटकावला. त्यात पटेल अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल शाखेच्या ऋषिकेश पाटील, सागर पाटील, विशाल पाटील व निखिल माळी या विद्यार्थ्यांच्या समूहाने सहभाग नोंदविला. या स्पर्धेकरिता प्रा.विजय जाधव व प्रा.पंकज बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले.