असंघटित कामगार काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी पंकज सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 11:25 IST2018-12-24T11:24:54+5:302018-12-24T11:25:23+5:30

शिंदखेडा : निवडीनंतर सत्कार कार्यक्रम

Pankaj Sonawane, the unorganized worker of Congress Taluka, | असंघटित कामगार काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी पंकज सोनवणे

असंघटित कामगार काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी पंकज सोनवणे

लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : असंघटित कामगार काँग्रेसच्या शिंदखेडा तालुका अध्यक्षपदी धमाणे येथील पंकज सोनवणे यांची निवड करण्यात आली. 
माजी कामगार राज्यमंत्री डॉ.हेमंत देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, माजी नगराध्यक्ष तथा पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या जूई देशमुख, असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाजीम शेख, पंचायत समिती सदस्य मनोहर देवरे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश पाटील, माजी सभापती किशोर पाटील, जिल्हा नियामक मंडळ सदस्य आबा मुंडे, अ‍ॅड.रवींद्र मोरे आदी उपस्थित होते. 
निवडीनंतर पंकज सोनवणे यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी धमाणे येथील प्रकाश कुंभार, अजय कराडे, दवा पाटील, राजेंद्र पाटील, अनिल पाटील, भुषण पाटील, बाळू पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Pankaj Sonawane, the unorganized worker of Congress Taluka,

टॅग्स :Dhuleधुळे