पंचवटीमधील महिलेला गंडविले संमोहीत करुन दागिने केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 22:53 IST2019-10-19T22:53:20+5:302019-10-19T22:53:40+5:30

दीड लाखांचा ऐवज : दोन ठगांचा प्रताप, सावधानतेचा इशारा

Panchavati lumps jewelry by seducing a woman with a bandit | पंचवटीमधील महिलेला गंडविले संमोहीत करुन दागिने केले लंपास

पंचवटीमधील महिलेला गंडविले संमोहीत करुन दागिने केले लंपास

धुळे : देवपुरातील पंचवटी भागात दोन ठगांनी मंदिरातील पुजारी महिलेला तब्बल दीड लाखांत ठगविले़ या महिलेला संमोहित करुन अंगावरील आणि घरातील असे एकूण दीड लाख रुपये किंमतीचे ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लुटून नेले़ ही घटना गजबजलेल्या वस्तीत आणि सकाळच्यावेळेस घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ 
पंचवटी भागात राहणाºया सुनंदाबाई मोहन गोसावी या घरी सकाळी देवाची पुजा करीत होत्या़ त्याचवेळेस दोन अज्ञात व्यक्ती आले़ त्यांनी मंदिरात पैसे दान करायचे असे सांगून बॅगेतून नोटांचे बंडल काढले़ यावेळी पैशांची बॅग उघडताच सुनंदाबाई यांची शुध्द हरपली़  यानंतर दोघा ठगांनी जसे सांगितले त्याप्रमाणे सुनंदाबाई यांनी केल्याचा संशय आहे़ सुनंदाबाई यांनी अंगावरील आणि घरातील पेटीत ठेवलेले तब्बल ३६ ग्रॅम वजनाचे दीड लाख रुपये किंमतीचे दागिने काढून दिले़ यानंतर क्षणार्धात या दोघा ठगांनी दागिने घेऊन धूम ठोकली़ 
घटनेनंतर काही वेळाने शुध्द आल्याने सुनंदाबाई यांनी घरातून बाहेर धाव घेतली़ आरडाओरड केला़ मात्र तो पर्यंत दोघेही ठग पसार झाले होते़ या दोघा ठगांचे छायाचित्र एका दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहे़ याप्रकरणी सुनंदाबाई गोसावी यांच्या फिर्यादीवरुन देवपुर पोलिसात दोन अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे़ पोलीस आता सीसीटीव्हीच्या आधारे या दोघा ठगांचा शोध घेत आहे़ 
दरम्यान, दोघे ठग हे सकाळी पंचवटी परिसरात आले़ तेव्हा एक पाटील आजी घराच्या ओट्यावर बसलेल्या होत्या़ त्या आजीबाईच्या अंगावरील सोन्याचे दागिने बघून हे दोघे ठग त्याठिकाणी थांबले़ त्यांचा इरादा हा आजीबाईच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करण्याचा होता़ परंतु घरातून त्यांची सून आल्याने दोघा ठगांचा मनसुबा उधळला गेला़ आपली पोल उघडू नये यासाठी दोघांनी तात्काळ आपला प्लॅन बदलला असावा असा अंदाज आहे़ आम्हाला पैसे दान करायचे आहेत असे सांगून त्यांनी महिला पुजारी सुनंदाबाई यांचे घर गाठले आणि त्यांना ठगविले़ 

Web Title: Panchavati lumps jewelry by seducing a woman with a bandit