पनाखेडला तरुणाच्या डोक्यात दगड टाकून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:19 IST2019-09-17T12:16:45+5:302019-09-17T12:19:17+5:30
मुंबई आग्रा महामार्ग : घटनास्थळी पोलीस दाखल

पनाखेडला तरुणाच्या डोक्यात दगड टाकून खून
धुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पनाखेड येथे एका तरुणाच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली़ ही बाब सकाळी उजेडात आली़ मोहम्मद नवशाद अन्सारी (वय अंदाजे ४०) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे़ त्याचे पनाखेड येथे महामार्गावर टायर पंक्चरचे दुकान होते़ नेमका खून कोणी केला, कोणत्या कारणामुळे झाला याचा उलगडा झालेला नाही़ घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आणि पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे़