सोनगीर येथे पालखी मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 18:53 IST2019-06-24T18:53:15+5:302019-06-24T18:53:45+5:30
श्री गुरु गोविंद महाराज पुण्यतिथी : उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

पालखीसह सरपंच धनंजय कासार.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनगीर : येथील आनंदवन संस्थानतर्फे सिद्ध परमहंस श्री गुरु गोविंद महाराज यांच्या ९९व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त रविवारी पालखी काढण्यात आली.
गावातील प्रमुख मार्गे पालखी काढण्यात आली. यावेळी गावातील गणेश मित्र मंडळांनी ढोल ताशांच्या गजरात पालखीचे स्वागत केले. १६ जून रोजी डॉ.मुकुंदराज महाराज यांच्या उपस्थितीत उत्सवाला प्रारंभ झाला आहे. उत्सव काळात आनंदवन संस्थान येथे दररोज सामूहिक हरिपाठ, जप, आरती, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे झाले. उत्सवासाठी राज्यासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. २४ रोजी सकाळी १० वाजता काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे. उत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसरात विविध व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. आनंदवन संस्थानातर्फे भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.