ॲाक्सिजन प्लांट निर्मितीचे काम वेगात सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:27 IST2021-06-04T04:27:25+5:302021-06-04T04:27:25+5:30
पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालय प्रांगणात १०० लिटर क्षमतेचा ॲाक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहे. हा प्लांट ग्रामीण रुग्णालयातील ...

ॲाक्सिजन प्लांट निर्मितीचे काम वेगात सुरू
पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालय प्रांगणात १०० लिटर क्षमतेचा ॲाक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहे. हा प्लांट ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांसाठी उपचारादरम्यान उपयोगी पडणार आहे. कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता रोड बांधकाम क्षेत्रातील हाईट्स या कंपनीकडून हा ऑक्सिजन प्लांट मंजूर करण्यात आला आहे, तर या प्लांटचे बांधकाम नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया हे करीत आहे, प्लांट ७ बाय ९ मीटर मधे होत आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असता रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत होती. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हाईट्स कंपनीने १००लिटर पर मिनिटं ऑक्सिजन प्लांट मंजूर केला आहे. तीस रुग्णांना एकाच वेळी आता ऑक्सिजन मिळणार आहे. थोड्याच दिवसांत हवेपासून ऑक्सिजन बनवणारी मशिनरी येथे दाखल होईल. अवघ्या काही दिवसांतच हा संपूर्ण प्लांट तयार होणार आहे. अभियंता यशोदीप पायील हे या प्लांटचे काम करीत आहे