धुळ्यात कोरोनाची साथ कमी झाली, डेंग्यू, मलेरियाही नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:44 IST2021-06-09T04:44:24+5:302021-06-09T04:44:24+5:30
अशी घ्यावी काळजी डास चावल्यानंतर साधारण: ५ ते ७ दिवसानंतर डेंग्यूची लक्षणे दिसायला लागतात. डेंग्यू ताप फ्लूसारखाच आहे. तो ...

धुळ्यात कोरोनाची साथ कमी झाली, डेंग्यू, मलेरियाही नियंत्रणात
अशी घ्यावी काळजी
डास चावल्यानंतर साधारण: ५ ते ७ दिवसानंतर डेंग्यूची लक्षणे दिसायला लागतात. डेंग्यू ताप फ्लूसारखाच आहे. तो डेंग्यू -१, डेंग्यू -२, डेंग्यू -३, डेंग्यू -४, या विषाणूपासून होतो. एडिस डासांची लांबी ६-६ मिमी असते. या डासाच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. त्याला टायगर मॉस्किटो म्हणतात. हा डास दिवसा चावतो. हा डास लोंबकळणाऱ्या वस्तू दोरी, लाइटची वायर, छत्री, काळे कपडे आदी ठिकाणी विश्रांती घेतो. या डासांची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात आणि वर्षभरानंतर पाणी उपलब्ध होताच त्यामधून पुन्हा अळी तयार होते. त्यामुळे डास अळी असलेली भांडी घासून पुसून -धुऊन स्वच्छ ठेवावी.
अशी रोखा डासांची उत्पत्ती
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवावा, घराभोवती व परिसरात ज्यामध्ये पाणी साचू शकेल, अशा निरुपयोगी वस्तू फेकाव्यात, खराब टायरमध्ये पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याचे भांडे, ड्रम, रांजण व्यवस्थित झाकून ठेवावे. झाकण नसल्यास जुन्या कपड्याने झाकावेत, पाण्याच्या टाक्यांना झाकणे बसवावी, शौचालयाच्या व्हेंट पाइपला जाळी अथवा कापड बांधावे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळवा, घराजवळील डबके बुजवावे, डबक्यात गप्पी मासे सोडावे. डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावीत.
कोट
काळजी घेणे गरजेचे
चिकटलेली अंडी नष्ट होतील. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तीव्र ताप, डोकेदुखी, उलटी, अंगदुखी, डोळ्याच्या खोबणीमध्ये दुखणे, अंगावर लालसर पुरळ, तीव्र पोटदुखी आणि गंभीर रुग्णास रक्तस्राव होतो.
अनिल पाटील
जिल्हा हिवताप अधिकारी.