नरडाणा ग्राेथ सेंटरमध्ये अन्य उद्योगही सुरू व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:37 IST2021-02-24T04:37:09+5:302021-02-24T04:37:09+5:30
निवेदनात म्हटले आहे की, नरडाणा ग्रोथ सेंटरमध्ये नव्याने येणाऱ्या सिमेंट कंपनीने वातावरण प्रदूषित होणार नाही याचा विचार करून उद्योग ...

नरडाणा ग्राेथ सेंटरमध्ये अन्य उद्योगही सुरू व्हावे
निवेदनात म्हटले आहे की, नरडाणा ग्रोथ सेंटरमध्ये नव्याने येणाऱ्या सिमेंट कंपनीने वातावरण प्रदूषित होणार नाही याचा विचार करून उद्योग उभारावा. पर्यावरण विभागाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. ज्या शेतकऱ्यांची जमिनी अधिग्रहित करण्यात आली आहे त्या शेतकऱ्यांना तातडीने मोबदला द्यावा, कंपनीत नाेकरभरती करताना स्थानिक कामगारांना प्राधान्य द्यावे, कंपनीला मिळणाऱ्या वार्षिक नफ्याच्या १० टक्के निधी स्थानिक ग्रामस्थांच्या सेवा सुविधांवर खर्च करावा, नरडाणा ग्रोथ सेंटरच्या परिसरात सुसज्ज रुग्णालय उभारावे, ग्रोथ सेंटरमध्ये असलेल्या सिमेंट कंपन्यांतर्फे निकषांचे पालन हाेते का याची तपासणी करावी, नरडाणा एमआयडीसीत केवळ सिमेंट उद्याेगांनाची उभारणी न करता टेक्सटाइल, फळप्रक्रिया, दूधप्रक्रिया ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपन्या सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे. कंपन्याकडून नियमांचे पालन हाेते का नाही याची पाहणी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमावी, अशी मागणी लीलाधर साेनार, पंकज साेनवणे, अनिता बैसाणे, बाळा पवार, गाेकुळ जगदाळे, अशाेेक पाटील आदींनी केली आहे.