थाळनेर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्ताने वेबिनारचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:38 IST2021-08-22T04:38:28+5:302021-08-22T04:38:28+5:30

वेबिनारचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ.जी.जे. गावीत यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी ...

Organizing a webinar on the occasion of International Youth Day at Thalner College | थाळनेर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्ताने वेबिनारचे आयोजन

थाळनेर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्ताने वेबिनारचे आयोजन

वेबिनारचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ.जी.जे. गावीत यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. विजय झुंजारराव यांनी मांडले तर प्रमुख व्याख्याते ग्रामीण रुग्णालय थाळनेर येथील आय.सी.टी.सी. विभागाचे समुपदेशक अमोल पाटील यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना एच.आय.व्ही. एड्स या रोगाबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले तसेच आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने ज्या विविध स्पर्धांचे आयोजन त्यांच्या विभागातून केले जाते, त्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्यात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या मनात एड्ससंदर्भात असलेल्या शंकांचेदेखील त्यांनी यावेळी निरसन केले. यानंतर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.जी.जे. गावीत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या थीममागील उद्देश लक्षात आणून देऊन चीनपासून निर्माण झालेल्या कोविड या महामारीने संपूर्ण जगाला कसे हादरून सोडले म्हणजे वर्तमान काळात एखाद्या राष्ट्राची समस्या ही त्या राष्ट्रापुरतीच मर्यादित न राहता जागतिक पातळीवर कशी येऊन पोहचते याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.विजय झुंजारराव यांनी केले तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सहाय्यक अधिकारी प्रा. एम. डी. रणदिवे यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमास प्रा.सतीश बोरसे, प्रा.डॉ.तेजस शर्मा, डॉ. राजकुमार आहिरे,प्रा.एस.एस. राठोड, प्रा.रघुनाथ सोनवणे, प्रा. हितेंद्र माळी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Organizing a webinar on the occasion of International Youth Day at Thalner College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.