धुळे महानगर भाजपच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार सर्व कलावंतांना शिवगान स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ही स्पर्धा छत्रपती शिवरायांवरील पोवाडे, पाळणे, शिवस्फूर्तिगीते, आरती, ओव्या, ललकारी, अभंग आदी प्रकारच्या गीतांची असेल. महानगर भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठप्रमुख राहुल बागुल यांनी शिवजयंतीनिमित्त शिवगान स्पर्धेचे आयोजन केले आहे. ९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शाहू महाराज कलामंदिर येथे सकाळी ९ वाजता या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राधा ही बावरी... या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेले सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, आमदार जयकुमार रावल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव, धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जि.प अध्यक्ष तुषार रंधे उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास कलाकार प्रेमाकिरण, तुषार बैसाणे, अंजली नेवासकर, सचिन अवसरमल व संगीत दिग्दर्शक तेजस चव्हाण आदी सहभागी होणार आहेत. या स्पर्धेप्रसंगी कलावंतांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिवजयंतीनिमित्त महानगरात शिवगान स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:31 IST