शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

उद्यापासून चार वाजता दुकाने बंद करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 9:26 PM

जिल्हाधिकारी। अंमलबजावणीसाठी झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती

धुळे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दुकानांची वेळ एक तासाने कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ सोमवारपासून दुपारी चार वाजता दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी जारी केले आहेत़ अंमलबजावणीसाठी झोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ सायंकाळी चार ते सकाळी सहापर्यंत संपूर्ण संचारबंदीच्या सूचना आहेत़कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. त्याबरोबरच मिशन बिगिन अगेन राबवीत जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न आहे. मात्र, धुळे महानगरपालिका क्षेत्रात व्यापारी व नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिका क्षेत्रात सोमवारपासून वैद्यकीय व अति तातडीच्या शासकीय सेवा वगळता अन्य सर्व आस्थापना व सेवा दुपारी चार वाजताच बंद होतील. वैद्यकीय व आपत्कालीन अत्यावयशक सेवा वगळून दुपारी ४ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी राहील़कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मिशन बिगिन अगेनसाठी निर्धारित केलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची जास्त शक्यता आहे. महानगरपालिका क्षेत्रात राजपत्रित दर्जाचे झोनल अधिकारी नियुक्त करून मिशन बिगिन अगेनची शासन नियमाप्रमाणे प्रभावी अंमलबजावणी होते किंवा कसे याची वेळोवेळी पाहणी करून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून दर तीन तासाला अहवाल अपर तहसीलदार, धुळे व प्रांत अधिकारी, धुळे यांना सादर करणार, असा निर्णय महानगरपालिका प्रशासनाबरोबर झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारपासून या निर्णयाची अमलबजावणी करण्यात येणार आहे.संबंधित झोनल अधिकारी धुळे महानगरपालिका क्षेत्रात ठरवून दिलेल्या वेळी दुकाने चालू आहेत किंवा नाही, नागरिक मास्कचा वापर करीत आहेत की नाही, सॅनिटायझर वापर, वाहतूक नियंत्रण आदींचे व्हीडिओ चित्रीकरण करून प्रशासनास सादर करतील. त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या बाबतीत सर्व नागरिक आस्थापना व सेवा पुरविणारे व्यापारी यांनी प्रशासनास सहकार्य करणे अभिप्रेत आहे.नियम मोडणाºयांवर कारवाईचा इशारादुकानदार आणि नागरिकांनी प्रशासनास सहकार्य न केल्यास व कोरोना विषाणूच्या संसर्गात वाढ झाल्यास यापेक्षाही कठोर कार्यवाही केली जाईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे