धुळे जिल्ह्यात स्वच्छता अभियानाची व्याप्ती वाढविण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 21:49 IST2018-04-27T21:49:16+5:302018-04-27T21:49:16+5:30
जिल्हा परिषद : यंदापासून ग्रा. पं. पातळीवर उत्कृष्ट प्रभाग स्पर्धा

धुळे जिल्ह्यात स्वच्छता अभियानाची व्याप्ती वाढविण्याचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानाची व्याप्ती वाढविण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला आदेश दिले आहे. तसेच या अभियानाबाबात सुधारित मार्गदर्शक सूचनाही कळविल्या आहेत. तसेच यंदापासून ग्रामपंचायत स्तरावर घेण्यात येणाºया ‘उत्कृष्ट प्रभाग स्पर्धा’ याविषयी नियमावली प्रशासनाला कळविण्यात आली असून त्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू आहे.
शासनाकडून संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व ते ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांपर्यंत कसे पोहचले? यासाठी शासनाने जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला देण्यात आले आहेत. या अभियानासाठी राज्यस्तरावरील उच्चाधिकार समितीत प्रमुख दहा विभागाचे सचिव, प्रधान सचिव हे सदस्य असणार आहे. तर जिल्हा पातळीवर सनियंत्रण समिती नियुक्त केली जाईल. त्याचे अध्यक्ष हे पालकमंत्री तर सचिव जिल्हा परिषद अध्यक्ष असतील. तसेच जिल्ह्यातील इतर प्रमुख अधिकाºयांचादेखील त्यात समावेश राहणार आहे.
ग्रामसभा घेण्याचे निर्देश
संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानाची सुरुवात १ मेपासून होईल. त्यात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे. याउद्देशाने १६ ते ३१ मे या काळात ग्रामसभा भरविण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
ग्रामसभेत योजनेबद्दल माहिती देऊन नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे सूचित करण्यात आले आहे. पुढीलवर्षी फेब्रुवारी २०१९ मध्ये सहभागी गावाची पाहणी करून बक्षीस पात्र गावांची निवड केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.