कोविड रुग्णालयाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 21:56 IST2021-03-30T21:56:39+5:302021-03-30T21:56:58+5:30
रहिवासी वस्तीत परवानगी दिल्याने नागरिकांचा विरोध

कोविड रुग्णालयाला विरोध
धुळे : येथील चाळीसगाव रोडवरील मन्यार सोसायटीमध्ये असलेल्या इकरा हाॅस्पिटलमध्ये जानेवारी महिन्यापासून कोविड रुग्णालय सुरु असून या रुग्णालयाला स`थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे.
या भागातील अजमेरानगर, मनियार सोसायटी, आशियाना काॅलनी आदी भागातील रहिवाशांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करुन या रुग्णालयाला विरोध दर्शविला. काेरोना बाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तसेच कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या नातेवाईकांची या भागात गर्दी कायम आहे.
परिसरामध्ये वावरणे, हाततोंड धुणे, थुंकणे असे प्रकार सातत्याने सुरु असतात. स`थानिक रहिवाशांना कोरोनाचा धोका आहे. रहिवासी वस्तीमध्ये कोविड रुग्णालयाला परवानगी दिलीच कशी असा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात उपस`थित करण्यात आला आहे. याबाबत चाैकशी करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आला आहे. आंदोलनाचा इशारा दिला आहे.