भारतीय संस्कृतीची माहिती जगापुढे मांडण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:07 IST2019-04-27T23:05:08+5:302019-04-27T23:07:41+5:30

आंतरराष्ट्रीय संस्थेचे सदस्य तथा प्राचार्य डॉ़ अडसुळे

 The opportunity to showcase Indian culture information to the world | भारतीय संस्कृतीची माहिती जगापुढे मांडण्याची संधी

dhule

चंद्रकांत सोनार ।
भारतासह जगातील अन्य देशातील सामंजस्य आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्यासाठी जगातील ३० देशातील सामाजिक क्षेत्रातील अभ्यासकांना आपल्या देशातील माहिती इतर देशासंमारे मांडण्याची संधी देण्यात आली आहे़ त्यात पहिल्यांदाच भारताला संधी मिळाली असल्याचे कौन्सिल फॉर इंटरनॅशलन फेलोशिप या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सदस्य तथा डॉ़बाबासाहेंब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ जालिंदर अडसुळे यांच्याशी साधलेला संवादात सांगितले.
देशाचे कोणते प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे
कौन्सिल फॉर इंटरनॅशनल फेलोशिल या आंतरराष्ट्रीय संस्थेत ३० देशातील पाच अभ्यासकांची निवड झाली आहे़ त्यात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली आहे़ भारतीय संस्कृती, सण, उत्सव, भाषा, शिक्षण, सामाजिक, भौगोलिक विषयांची देवाणघेवाण होणार आहे़ त्यामुळे तिथल्या काही गोष्टींचा अभ्यास व अनुकरण करण्याची संधी आपल्या देशाला मिळू शकते़
परदेशात जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करावे?
इंग्रजी भाषेविषयी मनात भीती असते़ त्यामुळे परदेशात जाण्याची हिंमत विद्यार्थ्यांकडून केली जात नाही़ त्यामुळे देशाच्या प्रगतीस खिळ बसली आहे़ आधुनिक काळानुसार तंत्रज्ञान व इंग्रजी भाषा आत्मसात करणे गरजेचे आहे़ इंग्रजी भाषा जरी आपली मातृभाषा नसली तरी देशाची व स्व:ताची प्रगती महत्वाची आहे़
परदेशात जाण्याकडे विद्यार्थ्याचा कल का दिसत नाही?
शिक्षण व संशोधनासाठी परदेशात जाण्याऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते़ तरी देखील विद्यार्थी व संशोधक परदेशात जाण्यासाठी हिंमत दाखवित नाही़ त्यासाठी आत्मविश्वास, धाडसाची गरज आहे़ आपल्याही देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकते
कौन्सिल फॉर इंटरनॅशनल फेलोशिप या आंतर राष्ट्रीय संस्थेत भारताच्या प्रतिनिधित्वाची संधी डॉ.अडसुळे यांना मिळाली आहे़ आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड झालेले डॉ़ अडसुळे हे भारतातील एकमेव व्यक्ती आहे़ १ ते ९ मे या कालावधीत तैवान या देशातील कार्यशाळेत वेगवेगळ्या देशातील अभ्यासक सहभागी होणार आहे़ आपल्या देशातील नाविन्यपूर्ण बाबीवर चर्चा करून नवीन गोष्टीचे अनुकरण केले जाणार आहे़
३० देशात तीन दशकांपासून सेवा ४ कौन्सिल फॉर इंटरनॅशनल फेलोशिप ही अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण करणारी समाज सेवकांची संस्था आहे़ गेल्या ३ दशकांपासून जगातील जवळ जवळ ३० देशात ही संस्था कार्यरत आहे़ यामुळे जगातील १९५ देशात प्रतिनिधीत्व करण्याचा मानस या संस्थेचा आहे़

Web Title:  The opportunity to showcase Indian culture information to the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे