लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील आणखी सहा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आले. धुळे शहरातील पाच व ग्रामीण भागातील एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाली आहे. शक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील चाचण्यांची संख्या वाढली आहे. बुधवारी जिल्हा रुग्णालयात झालेल्या सर्व ७३९ चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १३ हजार ७५९ इतकी झाली आहे.धुळ्यातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना प्रयोगशाळेतून गुरुवारी मिळालेल्या अहवालानुसार जिल्हा रुग्णालय - येथे दोन दिवसापासून शिक्षकांच्या चाचण्या केल्या जात आहे. चाचणी करुन घेण्यासाठी शिक्षकांची प्रचंड गर्दी उसळत आहे. येथे घेण्यात आलेल्या ७३९ चाचण्याचे अहवाल निगेटिव्ह निघाले आहेत.दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय - येथे घेण्यात आलेले रॅपिड अँटीजन टेस्टचे सर्व २५० अहवाल निगेटिव्ह आले आहेत.शिरपूर उपजिल्हा रुग्णालय - येथे घेण्यो आलेले सर्वच सर्व ५३ अहवाल निगेटिव्ह आले.साक्री भाडणे - येथील कोविड सेंटर मधील सर्वच १४८ अहवाल निगेटिव्ह आले.महानगरपालिका पॉलिटेक्निक - महाविद्यालयातील रॅपिड अँटीजन टेस्टचे २४८ अहवालांपैकी चितोड रॊड येथील एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- वैद्यकीय महाविद्यालयात घेण्यात आलेल्या २५ अहवाल निगेटिव्ह आले.खाजगी प्रयोगशाळेतील २४ अहवालापैकी ५ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, बामणे १, आनंद नगर १, वल्लभ नगर १, आदर्श नगर १ व दत्त मंदिर चौकयेथील एकाच समावेश आहे.सोमवारी जिल्ह्यात फक्त दोनच अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर मंगळवारी २७ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. गुरुवारी पुन्हा अहवालाची संख्या घटली असून केवळ सहाच अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. शिक्षकांची कोरोना तपासणी होत असल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र तसे झालेले नाही.
केवळ सहा अहवाल निघाले पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 12:43 IST