शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

धुळे जिल्ह्यातील जि.प.शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळतोय फक्त भात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 15:20 IST

‘शापोआ’चा ठेका अद्याप दिला नाही, पैसेच मिळत नसल्याने, मुख्याध्यापकांचीही ‘खिचडी’ शिजेना

ठळक मुद्देआतापर्यंत मुख्याध्यापकांनीच स्वखर्चाने दिला पोषण आहारमात्र नोव्हेंबर महिन्यांपर्यंत पैसेच न मिळाल्याने, मुख्याध्यापकांचीही क्षमता संपलीविद्यार्थीही रोज भात खाण्यास कंटाळले

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र सुरू झाले असून, अद्याप शालेय पोषण आहाराचा ठेका देण्यात आलेला नाही. त्यामुळे आतापर्यंत मुख्याध्यापकांनीच स्वखर्चानेच शाळेत ‘खिचडी’ शिजवली.  मात्र आता तांदळा व्यतिरिक्त सर्वच साहित्य संपल्याने, जिल्ह्यातील बहुतांश जि.प.शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फक्त शिजविलेला भातच दिला जात असल्याची माहिती जि.प.शाळेच्या सुत्रांनी दिली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या पुढाकाराने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. विद्यार्थ्यांना शाळेत भोजन  पुरविण्याची यंत्रणा विकसीत केलेली आहे. शाळेमध्ये आहार शिजविण्यासाठी स्वयंपाकी व मदतनीस नियुक्त  करण्यात येतात.  विद्यार्थी संख्येच्या अनुषंगाने दरवर्षी राज्यशासनाकडून जिल्हा परिषदेला निधी दिला जात असतो. धुळे जिल्ह्यात एकूण ११०३ जिल्हा परिषदेच्या शाळा असून, त्यात ९३ हजार ९८९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यावर्षी दुसरे सत्र सुरू झाले तरी शासनस्तरावरून अद्याप धान्य पुरविणाºया ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे आतापर्यंत जि.प.शाळेच्या मुख्याध्यापकांनी पदरमोड करीत  खिचडी शिजविण्यासाठी लागणाºया सर्वप्रकारच्या डाळी, तेल, मीठ, हळद, तिखट, मोहरी, उसळी आदी वस्तू आणून,  विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार दिला. मात्र शालेय पोषण आहारासाठी ज्या-ज्या मुख्याध्यापकांनी पैसा गुंतविला त्यांना जुलैपासून  नोव्हेंबरपर्यंत पैसाच मिळालेला नाही. त्यामुळे ते देखील आता ‘शापोआ’साठी खिशातून पैसा टाकण्यास तयार नाहीत. अनेकांची पैसा खर्च करण्याची क्षमता संपलेली आहे. तसेच  अनेक शाळांमधील डाळी, तेल, तिखट, आदी साहित्य संपलेले आहे. साहित्य कोणी आणायला तयार नाही.  त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ भात दिला जात आहे.  दररोज फक्त भात मिळत असल्याने, विद्यार्थीही त्याला कंटाळलेले आहेत. विद्यार्थी रोज-रोज भात खायाला तयार नाहीत. त्यामुळे शिजविलेला भात तसाच पडून राहतो, किंवा जनावरांना घालावा लागतो अशी स्थिती निर्माण झालेली आहे. मदतनिसांना मानधन नाहीपोषण आहार शिजविण्यासाठी असणाºया मदतनीसांनाही गेल्या तीन-चार महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. त्यामुळे मदतनीसही पोषण आहार शिजविण्यास तयार नसल्याचे सांगण्यात आले.आर्थिक कोंडी होते : रोकडेगेल्या दोन अडीच महिन्यांपासून शालेय पोषण आहारासाठी स्वखर्चाने साहित्य आणत आहे. मात्र अद्याप त्याचे बिले न मिळाल्याने, आर्थिक कोंडी होत असल्याची प्रतिक्रिया बुरझड (ता.धुळे) जि.प.शाळेचे मुख्याध्यापक मुरलीधर रोकडे यांनी दिली.बहिष्कार टाकणार: पाटीलशालेय पोषण आहाराचा ठेका येत्या आठ दिवसात न दिल्यास या योजनेवर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिला आहे.