लसीकरणाची ॲानलाइन नोंदणी पद्धत बंद करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:36 IST2021-05-10T04:36:43+5:302021-05-10T04:36:43+5:30
निवेदनात म्हटले आहे की, जैताणे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड-१९चे लसीकरण सुरू आहे. गावातील बहुसंख्य नागरिक हे अशिक्षितआहेत. त्यांना ...

लसीकरणाची ॲानलाइन नोंदणी पद्धत बंद करावी
निवेदनात म्हटले आहे की, जैताणे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड-१९चे लसीकरण सुरू आहे. गावातील बहुसंख्य नागरिक हे अशिक्षितआहेत. त्यांना ॲानलाइन पद्धतीने नोंदणी करता येत नाही. किंवा बहुसंख्य ग्रामस्थांकडे स्मार्ट फोन नाहीत. ऑनलाईन कधी सुरु होते, याची माहिती ग्रामस्थांना मिळत नाही. ७ व ८ मे रोजी ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांसाठी ३०० डोस मिळाले. मात्र, यापैकी २५० डोस हे बाहेरच्या जिल्ह्यातील नागरिकांना मिळाले. तर स्थानिकांना फक्त ५०. ॲानलाइन नोंदणीचा फायदा बाहेरच्या गावातील लोकांना होत असून, स्थानिक नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. हा गावातील नागरिकांवर अन्याय आहे. त्यामुळे लसीकरणाची ऑनलाइन पद्धतीत नोंद बंद करण्यात यावी. अन्यथा आम्ही बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांचे लसीकरण होऊ देणार नाही. तसेच स्थानिक गावातील नागरिकांना ऑफलाईन पद्धतीने लसीकरण करण्यात यावे. लोकसंख्येनुसार लसीचा जास्तीत जास्त साठा जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्रास उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
त्याप्रसंगी उपस्थित साक्री तालुका पंचायत समितीचे सदस्य अशोक मुजगे ,निजामपूर ग्रामपालिकेचे सरपंच प्रतिनिधी मिलिंद भार्गव,गटनेते बाजीराव पगारे, सदस्य गणेश न्याहळदे,डॉ. महेश ठाकरे,महेश राणे,शरद नेरकर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संपूर्ण राज्यभरात कलम १४४ लागू आहे. इतक्या कडक निर्बंधांमध्ये ,अकोला,नगर,उल्हासनगर, वाशिम,बुलढाणा,जळगाव, नंदुरबार,नाशिक या जिल्ह्यांतीलच नव्हे, तर परराज्यातून,सुरत,बलसाड,नवसारीसारख्या शहरांमधून लोक इथपर्यंत येतातच कसे हादेखील खरा प्रश्न आहे . गेल्या पाच दिवसांपासून जैताने प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक उपाययोजना व समस्यांना सामोरे जावे लागले, तेव्हा कुठे परिस्थिती नियंत्रणात आली आहे. अशा स्थितीत बाहेरून आलेल्या लोकांमुळे पुन्हा एकदा गावात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे, असेही अशोक मुजगे म्हणाले.