नाशिक येथून कांदा व्यापाऱ्याला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 22:27 IST2020-12-14T22:27:34+5:302020-12-14T22:27:52+5:30
पिंपळनेर : सुनावली पोलीस कोठडी

नाशिक येथून कांदा व्यापाऱ्याला पकडले
पिंपळनेर: कांदा विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना व्यापाऱ्याकडून न मिळाल्याने अखेर संबंधित व्यापाºयाला पोलिसांनी अटक केली़ त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली़
गेल्या नऊ ते दहा महिन्यांपूर्वी शेतकºयांनी मार्केटमध्ये बिजासनी कंपनीचे मालक व्यापारी दीपक सोनू पाटील यांना कांदा विक्री केला होता़ या शेतकऱ्यांना अद्यापही पैसे न मिळाल्याने शेतकºयांनी आंदोलन केले होते़ व्यापारी पैसे देत नसल्याने शेतकऱ्यांनी मार्केट कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता़ त्यावेळी संतप्त शेतकरी व शाखाप्रमुख पोलीस ठाण्यात व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते़ गुन्हा दाखलवेळी त्यावेळेचे अधिकारी यांनी टाळाटाळ केली होती़
यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रस्ते आस्थापना विभागाचे जिल्हाध्यक्ष धीरज देसले यांनी त्यावेळचे नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते़ त्यानंतर दोरजे यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना दूरध्वनीवर निर्देश दिल्यानंतर संबंधित तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांनी संजय बावा यांची फिर्याद घेतली होती.
शेतकºयांना न्याय मिळत नसल्याने संबंधित अन्यायकारक शेतकºयांनी नाशिक येथे जाऊन विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांची भेट घेतली व घडलेला सर्व प्रकार यावेळी सांगण्यात आल्याचे शेतकºयांनी सांगितले़ तसेच साक्री येथे प्रताप दिघावकर आले असता यावेळी देखील या शेतकºयांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते़ घटनेचा तपास यानंतर अधिक वेगाने झाल्याने पोलिसांनी सापळा रचून नाशिक येथून गोपनीय माहितीच्या आधारे कित्येक दिवसापासून मिळून न येणारा कांदा व्यापारी दीपक सोनू पाटील याला अटक केली़ संबंधित व्यापाऱ्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे तपास करीत आहेत.