धुळ्यातील दोंडाईचात एकाचा चाकूने भोसकून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 16:51 IST2023-05-08T16:50:19+5:302023-05-08T16:51:17+5:30

नरेश लालचंद शाहू गेल्या आठ महिन्यांपासून हॉटेल येथे कार्यरत होता.

One was stabbed to death in Dhule | धुळ्यातील दोंडाईचात एकाचा चाकूने भोसकून खून

धुळ्यातील दोंडाईचात एकाचा चाकूने भोसकून खून

राजेंद्र शर्मा

दोंडाईचा : दोंडाईचा नंदुरबार रस्त्यावर हॉटेल पुष्पा येथे आचारीचे काम करणारा कारागीर नरेश लालचंद शाहू (वय ५४) याचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. सकाळी ही बाब लक्षात आली.

नरेश लालचंद शाहू गेल्या आठ महिन्यांपासून हॉटेल येथे कार्यरत होता. तो मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. रात्री आचारीचे काम केल्यानंतर मयत हा हॉटेलात झोपत होता. रविवारी मध्यरात्री नरेश शाहू यास कोणीतरी अज्ञाताने चाकूने भोसकून खून केला. सकाळी ही घटना समजल्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. पोलिसांनी दोन चाकू जप्त केलेत.

Web Title: One was stabbed to death in Dhule

टॅग्स :Dhuleधुळे