शिरपूर न्यायालय परिसरात एकास मारहाण करुन पैसे हिसकाविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 11:48 IST2020-01-02T11:48:29+5:302020-01-02T11:48:48+5:30
पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल

शिरपूर न्यायालय परिसरात एकास मारहाण करुन पैसे हिसकाविले
आॅनलाइन लोकमत
शिरपूर : शिरपूर न्यायालयाच्या आवारात सोमवारी दुपारी कोर्टाच्या आवारात तौसिफ खाटीक हे कारमध्ये बसत असतांना कारच्या काचेवर दगडफेक करून तौसिफ यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून ४ हजार ७०० रूपये जबरीने हिसकावून घेतल्याची घटना घडली.
याप्रकरणी तौसिफ यांनी शिरपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन इरफान सत्तार खाटीक, रिझवान सत्तार खाटीक, हिना ातौसिफ खाटी, सत्तार अब्बास खाटी, रूबिना सत्तार खाटीक सर्व राहणार मौलाना चौक शिरपूर अशा पाच जणांविरोधात शिरपूर पोलिस ठाण्यात जबरीचा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.