एक एक मताची होतेय जुळवाजुळव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:29 IST2021-01-09T04:29:54+5:302021-01-09T04:29:54+5:30

नेर येथील ग्रामपचंयातीच्या १६ जागांसाठी निवडणूक होत आहे. अनेक ठिकाणी चौरंगी, दुरंगी, तिरंगी आणि सरळ लढती होत आहेत. त्यामुळे ...

One of the votes is a match | एक एक मताची होतेय जुळवाजुळव

एक एक मताची होतेय जुळवाजुळव

नेर येथील ग्रामपचंयातीच्या १६ जागांसाठी निवडणूक होत आहे. अनेक ठिकाणी चौरंगी, दुरंगी, तिरंगी आणि सरळ लढती होत आहेत. त्यामुळे एक एक मत उमेदवाराला महत्त्वाचे असल्याने त्याचे गणित जुळविणे सुरू झाले. यासाठी नातेवाईक, भाऊबंदकी आणि बाहेरगावी गेलेल्यांशी फोन, व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला जात आहे. एकदा संधी देण्याची विनंती त्यांना केली जात आहे. पुण्यासह मुंबई, नाशिक, सुरत, अहमदाबाद अशा अन्य मोठ्या शहरांत असलेल्या प्रभागातील मतदारांना जाण्या-येण्याचे भाडे देण्याचे कबूल करून मतदानासाठी गळ घातली जात आहे.

शक्तिप्रदशर्नासह घर ते घर प्रचार

सर्वच उमेदवारांनी ‘होम टू होम’ प्रचार सुरू केला आहे. यात घरातील ज्येष्ठ नागरिकांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेऊन ‘लक्ष’ असू देण्याची विनंती केली जात आहे. त्यांच्या अडीअचणींविषयी आस्थेवाईकपणे विचारपूस केली जात आहे. तर अनेक जण आपल्या कार्यकर्त्यांसह वॉर्डात शक्तिप्रदर्शन करीत फेरी मारत आहेत. आपणच यंदा विजयाचे दावेदार असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. यामुळे गावातील वातावरण प्रचाराने ढवळून निघत आहे.

अंत्यविधी, लग्नाला आवर्जून उपस्थिती

गावात एखाद्याचे निधन झाले असेल किंवा लग्नकार्य असेल तर त्या ठिकाणी उमेदवारांकडून आवर्जून उपस्थिती राखली जात आहे. तसेच काही मदत हवी असल्यास ती पुरविण्याचे आश्वासन दिले जात आहे. यात आपला निवडणुकीचा प्रचारही उरकला जात आहे.

Web Title: One of the votes is a match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.