नगरसेविकेच्या पतीविरोधात तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याने एकाने मोबाइल टाॅवरवर चढून केले शोलेस्टाईल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST2021-02-05T08:44:48+5:302021-02-05T08:44:48+5:30
२०१९ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या वेळी मतदानाच्या दिवशी गुलशन उदासी आणि सुरेश तोलाणी यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी दोघांनी ...

नगरसेविकेच्या पतीविरोधात तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याने एकाने मोबाइल टाॅवरवर चढून केले शोलेस्टाईल आंदोलन
२०१९ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या वेळी मतदानाच्या दिवशी गुलशन उदासी आणि सुरेश तोलाणी यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी दोघांनी परस्पराविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. दोघी तक्रारींची चौकशी केल्यानंतर त्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी न्यायालयात चौकशीचा अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने ती केस रद्द केली होती. परंतु त्यानंतर सुरेश तोलाणी यांनी पोलिसात निवेदन देऊन आपल्या विरोधात गुलशन उदासी यांनी खोटी फिर्याद दिली होती. खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी उदासीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी केली. यासंदर्भात वारंवार निवेदन देऊनही पोलीस त्याकडे लक्ष देत नाही. त्याचा राग येऊन सोमवारी सुरेश तोलाणी यांनी साक्रीरोडवर सिंचन भवनाजवळील रस्त्यालगत असलेल्या मोबाइल टाॅवरवर चढून गुलशन उदासी अटक झाली नाही तर आपण आत्महत्या करू अशी भूमिका घेतली. त्यामुळे पोलिसांची आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाची, महसूल यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. नंतर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी त्यांची समजूत काढली. तासाभराच्या चर्चेनंतर तोलाणी खाली उतरले. त्याला अटक करून पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिले. तासभर चालेले नाट्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होते.
तोलाणी यांना हद्दपार करा - उदासी
सुरेश तोलाणी याच्यावर शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल आहे. तोलाणी हा सराईत असल्यामुळे त्याला कोर्ट कचेरीचे चांगलेच ज्ञान आहे. तो लोकांना वेठीस धरून केेसेस करतो. प्रशासनाला नाहक त्रास देतो. म्हणून त्याला हद्दपार करा, अशी मागणी गुलशन उदासी यांनी सायंकाळी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना दिले. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, भिकन वराडे, हर्षकुमार रेलन, नागसेन बोरसे, भगवान गवळी, प्रकाश छेतिया, किरण कुलेवार, कशीश उदासी, सारीका अग्रवाल आदी उपस्थित होते.
याप्रकरणी न्यायालयाच गुलशन उदासी यांना अटक करण्याचे आदेश देऊ शकतात. त्यामुळे जोपर्यंत न्यायालय आदेश देत नाही. तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही, असे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले.