क्षुल्लक कारणावरुन एकाला झोडपले, शिंदखेडा तालुक्यातील माळीच येथील घटना

By देवेंद्र पाठक | Updated: March 30, 2023 17:14 IST2023-03-30T17:14:01+5:302023-03-30T17:14:28+5:30

प्लॉटवर भराव का करीत आहेत असा जाब विचारला. काहीही कारण नसताना वाद घातला.

One person was beaten up for a trivial reason, an incident at Malich in Shindkheda taluk. | क्षुल्लक कारणावरुन एकाला झोडपले, शिंदखेडा तालुक्यातील माळीच येथील घटना

क्षुल्लक कारणावरुन एकाला झोडपले, शिंदखेडा तालुक्यातील माळीच येथील घटना

धुळे : प्लॉटवर भराव का करत आहे असे विचारत एकाला महिलेसह चौघांनी शिवीगाळ करीत हाताबुक्याने मारहाण केली. ही घटना शिंदखेडा तालुक्यातील माळीच गावात रविवारी रात्री घडली. याप्रकरणी बुधवारी दुपारी नरडाणा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रमेश जिजाबराव पाटील (वय ४७, रा. माळीच ता. शिंदखेडा) यांनी नरडाणा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शिंदखेडा तालुक्यातील माळीच गावात रमेश पाटील यांचा प्लॉट आहे. या प्लाॅटवर पाटील दाम्पत्य भराव करीत होते. रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास महिलेसह चार जण तिथे आले.

प्लॉटवर भराव का करीत आहेत असा जाब विचारला. काहीही कारण नसताना वाद घातला. शिवीगाळ करत हाताबुक्याने मारहाण केली. यात एकाने त्याच्या हातातील काठीने वार केल्याने पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली. मारहाणीत जबर दुखापत केल्यानंतर चारही जणांनी घटनास्थळावरुन पळ काढला. जखमी अवस्थेत पाटील यांच्या पत्नीने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर रमेश पाटील यांनी नरडाणा पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली त्यानुसार, बुधवारी दुपारी साडेबारा वाजता चार जणांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हेड कॉन्स्टेबल भागले घटनेचा तपास करीत आहेत

Web Title: One person was beaten up for a trivial reason, an incident at Malich in Shindkheda taluk.